मधुमेह / डायबेटीस मध्ये पायाची काळजी कशी घ्यावी
मधुमेह / डायबेटीस मध्ये पायाची काळजी कशी घ्यावी
मधुमेह मध्ये पायाची काळजी घेतल्यास ८५ ते ९० % डायबेटिक लोकांचे पाय कापणे /मेजर अँप्युटेशन (major amputation) टळू शकते आणि पाय वाचू शकतो .
1 ) पायाची चाचणी : सर्वात महत्वाची सूचना , रोज फक्त १ मिनट स्वतःच्या पायाचा नीट निरीक्षण करा .
पायाचा नीट निरीक्षण करा
दोन बोटांच्या मधील जागेचे निरीक्षण करा
स्वतः च्या हाताने आपल्या पायाची चाचणी करा . वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला सुद्धा निट बघा . कुठे ही काही सूज आली असेल किंवा काही भाग गरम झाला असेल, किंवा पायाच्या रंगात बदल झाला असेल किंवा कुठे दुखत असेल ,तर लागलीच त्या भागाची पट्टी ( DRESSING ) करून योग्य त्या डॉक्टरला दाखवा . तुलने साठी दुसरा पाय बघा . कुठलीहीजखम /सूज वेळीच बघून इलाज केला तर ती पुढे वाढत नाही आणि सध्या उपचाराने जखम बरी होऊ शकते व ऑपरेशन तळू शकते
2) नियमितपणे आपले पाय धुवा:
दररोज आपले पाय धुणे आणि परीक्षण करणे महत्वाचे आहे . कोमट पाणी आणि सौम्य साबण वापरा . आपल्या हाताच्या कोपरा ने प्रथम पाण्याचे तापमान नेहमी तपासा .
१) पाण्याचा तापमान बघा .
२) सौम्य साबण वापरा .
३) कोमट पाणी वापरा नाही तर चामडी भाजू शकते
4) दोन बोटांच्या मधील जागा साफ करायला विसरू नका
* दोन बोटांच्या मध्ये असलेल्या जागेत बघण्यास विसरू नका . कधी कधी जखम (इन्फेक्शन / infection) तिथे चालू होऊ शकते . उदाहरणार्थ: काही लोकांना या जागी चिखल्या होतात .ज्या पांढऱ्या थरा सारख्या दिसतात. येथून जखम (Infection) पायाच्या आत पसरू शकते .
* आपल्या पायाच्या बोटांच्या मधील जागा बघायला आणि कोरडी करायला विसरू नका
सौम्य साबण आणि कोमट पाण्याने पाय धुवायचे
मऊ कापडाने हळूवारपणे सुकवा
(3) त्वचेची काळजी
आपली त्वचा मऊ आणि कोमल ठेवण्यासाठी तेलकट पदार्थ वापरा त्याच्याने त्वचेतील भेगा होणार नाही . चामडी तेलकटअसल्यास कमी खाज सुटेल . कोरड्या आणि गरम त्वचेवर जास्त खाज सुटते . तुम्ही कुठलीही moisturizing cream वापरू शकतात ,नारळाचे तेल हा स्वस्त ,उत्तम, आणि घरगुती उपाय आहे . परंतु हे जखमे वर लाऊ नये .
Apply moisturizer (coconut oil) to keep your skin soft
1) त्वचेला मऊ ठेवण्या साठी त्या वर (MOISTURIZER) किंवा खोबऱ्याचे तेल लावा.
2) बहुतेक घरातली लादी गुळगुळीत असते त्याने सावध राहा पाय घसरू शकते
(4)बोटांच्या नखांची काळजी :
पायाच्या बोटांची नखे नेहमी सरळ आडवी कापावी . ती कोपऱ्या मध्ये जास्त कापायचा प्रयत्न करू नये . किंवा बोटाच्या आत मध्ये खोदत बसायचा प्रयत्न करू नये . चामडीच्या अगदी जवळ नख कापत बसल्यास बऱ्याचदा चामडीला जखम होऊन तिथून आत मध्ये पसरू शकते.
नखे खूप जाड किंवा कडक किंवा वाकडी तिकडी झालेली असतील, तर ती कापण्यासाठी काही विशिष्ट उपकरणाची गरज आहे . त्या साठी तुम्हाला योग्य डायबेटिक फूट स्पेसिलीस्ट ची सहायता घ्यावी लागेल .
तुमच्या पायातल्या संवेदना कमी झाल्या असतील किंवा रक्त प्रवाहाची समस्या असेल तर नखे कापणे शक्यतो तज्ञ लोकांकडून करून घ्यावी
(5) वहाणा /चपला /पादत्राणे : (BOOTS / SHOES )
योग्य प्रकारचे बूट पायात घातल्यास पायाच्या बऱ्याचश्या समस्यां ( डायबेटीसच्या / मधुमेही ) रुग्णांन मध्ये टाळू शकतात .
बहुतेक डायबेटीसच्या / मधुमेही ) रुग्णांन मध्ये पायाचा आकार बदललेला असतो . शिवाय ज्या प्रकारे ती व्यक्ती चालते , ती पण इतर लोका पेक्षा वेगळी असते, त्याच्यामुळे पायांच्या काही भागां वरती जास्त प्रकारचा दाब पडतो . दाब जास्त पडल्यास तेथे जखम (अल्सर ulcer) निर्माण होऊ शकते . म्हणूनच योग्य प्रकारचे बूट घालणे फार महत्वाचे आहे . शिवाय ,नेहमी पायात मोजे घाला . पायात २४ तास मोजे असणे फार महत्वाचे . घरात ,बाहेर, सर्वत्र, मोजे घालावेत . त्या मुळे बऱ्याच जखमा टाळू शकता शिवाय ,पायाच्या चामडी वर दबाव कमी पडतो .
(A) चपला ,सॅंडल्स ,स्लीपर्स घालू नयेत . याच्याने पायाला जखमा होऊ शकतात .
(B)तुम्ही कुठल्याही बूट घातले तरी त्याच्या मध्ये निदान हे तीन गुणधर्म असणे महत्वाचे आहे .
(1)तुमचा पाय सर्व बाजूनी झाकला गेला पाहिजे. थोडक्यात बूट सर्व बाजूनी तुमच्या पायाला संरक्षण द्यायला पाहिजे . या मुळे बऱ्याचश्या जखमा /मच्छर , किड्याचे चावणे टाळू शकते.
(2)पायाचा तळवा बुटाच्या आतल्या ज्या भागा वरती पडतो, ज्याला इंग्लिश मध्ये (इनसोल / insole ) म्हणतात, ते जाड असणं महत्वाचे आहे . जाड आणि मऊ इन्सोल मुळे पायाचा दाब व्यवस्थितपणे सगळी कडे पसरला जातो . आणि एका विशिष्ट ठिकाणी दाब जास्त पडल्या मुळे पायाला होणाऱ्या जखमांची (ulcer) शक्यता कमी होते.
(3)बूट पुढच्या बाजूला रुंद असायला पाहिजे .म्हणजे सगळ्या बोटानां तिथे राहायला चांगली जागा मिळते . याच्यामुळे सगळी बोट व्यवस्थितपणे काम करतात . (घरात आणि बाहेर ) पाया मध्ये जाड मोजे घाला . हवाई चप्पल किंवा ज्यांना आपण स्लिपर्स (sleepers) म्हणतो किंवा कुठल्याही अंगठ्याच्या चपला उदाहरणार्थ कोल्हापुरी चप्पल सँडल्स टाळाव्यात .
Customised insole – showing customised curves and layers of different materials used
1) If customized footwear not available,
use sport shoes, one size bigger
नेहमी मोजे घाला : Always wear socks, in the house as well outside
लांब कॉटनचे मोजे घालावे आणि साधे स्पोर्टशूज घालावे . ज्या मध्ये खालील गुणधर्म आहेत.
वेलक्रो (Velcro) लावलेले, म्हणजे ते काढायला आणि घालायला सोपे जातील .
तुमच्या पाय पेक्षा एक साईझ मोठे म्हणजे पुढच्या भागांमध्ये बोटां साठी जागा मिळेल .
पायाच्या तळव्या लागतच बुटाचा तो भाग ज्याला इन्सोल (insole) म्हणतात तो जाडा आणि मऊ असायला पाहिजे.
हे बूट नियमित पणे दर ६ –१२ महिन्यात बदलत राहा ,कारण ते सैल पडत जातात आणि पायांचा आकार सुद्धा बदलत राहतो
Do not use slipper or hawai chappal
(6) पायाच्या समस्यांची सुरुवातीची चिन्हे पहा
चामडीचे जाड घट्टे : (Corn / callosity / warts)
योग्य डॉक्टरांना दाखवा . त्या स्वतः कापायचा प्रयतन नका करू आणि घरगूती उपाय वापरू नका
Pus Formation
पायामध्ये आधीपेक्षा कुठलाही बदल घडला तर त्याच्यावरती नीट लक्ष ठेवा
पायाचे infection
Discoloration of infected toe
पायाच्या पूर्वीच्या देखावातून होणार्या कोणत्याही बदलांमुळे एखाद्याला सतर्क केले पाहिजे. तुलना करण्यासाठी दुसरा पाय बघा . संसर्ग ( Infection) झाल्यास त्वचा लाल होऊ शकते . पू झाला तर पिवळे भाग दिसू शकतात. रंगात कोणताही बदल, विशेषत: जांभळा ते काळे अभिसरण समस्या दिसु शकते. जेव्हा रक्ताभिसरण कमकुवत होते तेव्हा एखाद्या व्यक्तीला जास्त वेदना होऊ शकतात आणि / किंवा एका पायाला दुसर्याच्या तुलनेत स्पर्श करणे थंड वाटू शकते.
(8) आपले पाय भाजण्यापासून वाचवा : बऱ्याच मधुमेहच्या रुग्णांना पायामध्ये कोणतीही सवेंदन नसते . काहीजणांनी हाथ लावलेले कळते . परंतु वेदना किंवा गरम गोष्टीची संवेदना नसते
चेतावनी (Warning) : कधीही गरम पाण्यात आपले पाय भिजवू नका. पायाच्या संवेदना गेल्यामुळे यात बराच धोका आहे . काही लोकांनी या मुळे पाय आणि जीव गमावले आहेत . आंघोळ करण्यापूर्वीच आंघोळीच्या पाण्याचे तापमान हाताच्या कोपऱ्याने तपासा .
जर तुम्ही कुठे ही थंड गार वातावरणात आहात तरीही सावधगिरी ठेवणे आवश्यक आहे. थंड हवेत बोटांपर्यंत जाणारे रक्त कमी होऊ शकते शिवाय जेव्हा कोणतीही संवेदना उरलेली नसते तेव्हा बऱ्याच उशीरा या गोष्टीकडे लक्ष जाते .
जर पाय भाजले तर वेळ गमावू नका. योग्य डॉक्टरांना दाखवा आणि योग्य इलाज करा.
(9)कुठल्याही प्रकाराची ( मलमे , ointment/cream) स्वतःहून लावायचे टाळा : डायबेटीस मध्ये पायांची चामडी बरीच नाजूक असते . शिवाय प्रतिकार शक्ती ही कमी झालेली असते . या वेगवेगळ्या कारणं मुळे पायाच्या चामडीला इजा होते .
जेव्हा पायावर जखम झालेली नाही, तेव्हा नारळाचे तेल अलगद पणे चोळावे .
10. तंबाखु चा वापर करू नका उदा : ( सिगरेट ,पान ,बिडी )
सिग्रेट ,बिडी ,पान ,तंबाकू ,गुटखा यांच्या मध्ये असणारी वेगवेगळी विषारी द्रव्य ,मुख्यतः निकोटीन आणि कार्बन मोनोऑक्साईड याच्या मुळे रक्तप्रवाहा वरती परिणाम होतो . पायाचा रक्तप्रवाह कमी होऊन पाय काळा (gangrene) होऊ शकते . त्यामुळे असल्या कुठल्या ही प्रकारचे व्यसन असेल तर तुम्ही ते पूर्णतः, लागलीच आणि कायम स्वरूपाचे बंद करा .
11. डायबेटीस आणि संपूर्ण शारिरीक आरोग्य:
आपला डायबेटीस ( मधुमेह ) नियंत्रणा खालीं ठेवा . योग्य आहार , शारिरीक व्यायाम, योग्यऔषधे वेळे वर घेऊन तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळी (blood sugar level) नियंत्रित ठेवा . याच्या मुळे दुष्परिणाम टळू शकतात . शिवाय बाकीच्या गोष्टी उदा. रक्तदाब, हृदयाचा आजार, कोलेस्ट्रॉल, वजन या गोष्टींची काळजी . या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर आणि डायबिटीस वर परिणाम होऊ शकतो . डायबेटीस सुरुवातीच्या काळामध्ये,असेल, तर तो बिना औषधाचा सुद्धा नियंत्रणाखाली ( रिव्हर्स डायबेटीस /reverse diabetes ) आणता येऊ शकते .
मधुमेहा मध्ये पायाची काळजी घेतल्यास ८५ ते ९० % डायबेटिक लोकांचे पाय ( amputation ) वाचू शकतात.